Press "Enter" to skip to content

परहूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने 20 मार्च रोजी श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम परहूर येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन

फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा होणार सन्मान

सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत •

मागील ४-५ वर्षापासून जागतिक हवामान बदलाचा फटका आंबा , भाजीपाला , फळे , कडधान्ये व सर्व प्रकारच्या फलोत्पादनाला बसला आहे . परिणामी शेतक – याचे उत्पादन घटून ते ४० टक्क्यावर आहे . याचा फटका कोकणातील व रायगड जल्ह्यातील आंबा खास करून हापूस आंबा उत्पाद्काना बसला आहे . तसेच येथील नगदी उत्पन मिलवनारी तोंडली भाजी , अलीबाग तालुक्यात कार्ले खिंड ते वाडगाव पर्यंतच्या सागाव , तळवली , कार्ले , नेहुली , खंडाळे , पवेळे या व आजूबाजुच्या परिसरात पारंपरिक पद्धतीने सफेद कांदा पिकवणारे शेतकरी उत्पादन घटल्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत .

शेतकरी वर्गासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने 20 मार्च रोजी श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम परहूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले आहे.

रायगड मधील आंबा फळपिक विम्याची रक्कम वाढवल्यामुळे शेतक – यांना विमा उतरवता आला नाही , तशातच मागील २ वर्षापासून कोरोना महामारीचे जागतिक संकट यामुळे विस्कळीत झालेली विक्री व्यवस्था , कृषी उत्पन्न बाजार समिती ( एपीएससी ) मधील दलाल वर्गाकडून होणारी शेतक – यांची फसवणूक याला पर्याय म्हणून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्राची मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादन संघाच्या वतीने राज्य शासनाकडे यापूर्वीच करण्यात आली आहे .

मेळाव्यात आंबा भाजीपाला पिकावरील रोगांच्या प्रादुर्भाव व प्रभावी उपाययोजना , रसायनमुक्त कृषी फलोत्पादन , शेतक – यांसाठी असलेल्या राज्य व केंद्र शासनाच्या योजना , वकिल ते पकिल यावर तसेच निर्यात संबंधी मार्गदर्शन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहाय्याने शेतक यांना उपकृत करणे, ॲक्सीस बँकेंच्या कर्ज वितरणानासंबधी योजना आदी विषयांवर तज्ञाचे मार्गदर्शन होणार आहे .

या कार्यक्रमास कृषी सहसंचालक कोकण एस . आर . पाटील , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय काळभोर , कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कर्जत कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ . एस . बी . भगत, रायगड आत्मा कृषी उपसंचालक सतीश बोराडे , जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ज.आर.मुरकुटे , महाराष्ट्र कृषी फलोत्पादन मंडळाचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे , समन्वयक , सेन्द्रिय कृषी अभयान आयुक्तालय पुणे सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थीत राहणार आहेत . यावेळी जिल्ह्यात कृषी फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे .

या मुख्य उद्देशांसाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने रविवार दि . २० मार्च २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता परहुर अलिबाग (रायगड )येथे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले असून जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.