Press "Enter" to skip to content

उपक्रमाचे शहरामध्ये कौतुक

पोलादपूर नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांची स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहरात प्लास्टीक पिशवीविरोधात जागृती

सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •

नगरपंचायत पोलादपूरतर्फे पोलादपूर बाजारपेठेमध्ये ग्राहक दिनानिमित्त स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत प्लास्टीक पिशवीविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी फेरी काढण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा सोनल गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार यांच्यासह महिला बालकल्याण सभापती अस्मिता पवार, माजी नगराध्यक्षा सुनिता पार्टे, सत्ताधारी नगरसेवक विनायक दिक्षित, स्नेहा मेहता, मुख्याधिकारी महादेव रोडगे, संजय कांबळे तसेच स्वच्छता कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

पोलादपूर नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती अस्मिता पवार यांनी महिला बचतगटांच्या साह्याने बनविलेल्या कागदी पिशव्यांचे नागरिकांना प्लास्टीक पिशवीविरोधी जनजागृतीपर अभियानांतर्गत वाटप केले. पोलादपूर नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सहभागी होऊन नागरिकांच्या प्रबोधनासाठी थेट रस्त्यावर उतरून केलेल्या उपक्रमाचे शहरामध्ये कौतुक होत आहे. यावेळी उपनगराध्यक्ष नागेश पवार यांनी पोलादपूरकर नागरिकांनी कागदी आणि कापडी पिशव्यांचा वापर करून प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळावा यासाठी नगरपंचायतीतर्फे जनजागृती करीत असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.