Press "Enter" to skip to content

खोपड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्धाटन

विकास कामांसाठी शिवसेनेचे जास्त झुकते माप पोलादपूरला : युवासेना अधिकारी विकास गोगावले

सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •

आमदार भरतशेठ गोगावले यांनी आमदारकीच्या काळात प्रत्येकवेळी विकास कामांचे सर्वात जास्त झुकते माप पोलादपूर तालुक्यालाच दिले असून पोलादपूरकरांचे आ.गोगावले यांच्यावरील प्रेम आणि सदभावना कायम राहणार आहेत, असा विश्वास दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले यांनी व्यक्त केला.

पोलादपूर तालुक्यातील खोपड येथे आ.भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ गुरुवर्य ह.भ.प.आनंददादा महाराज मोरे माऊली यांच्या उपस्थितीत आणि रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांच्याहस्ते तसेच जिल्हा परिषद चंद्रकांत कळंबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी दादा महाराज मोरेमाऊली यांच्याहस्ते सत्कार विकास गोगावले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना विकास गोगावले यांनी की, आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली या भागात कोटयवधी रुपयांची विकासकामे झालेली आहेत आणि उर्वरित कामे ही सुरु आहेत. काही कामांचा प्रशासकीय मान्यतेसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. त्याची देखील लवकरच पूर्तता करण्यात येईल. पोलादपूर तालुका हा दुर्गम भाग असल्याने सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वात जास्त निधी पोलादपूर तालुक्याला देण्यात आला आहे, असे सांगितले.

यावेळी डोंगर माथा ते पाणी टाकी पाईपलाईन योजना करणे, स्मशानभूमी व स्मशान शेड बांधणे, गावांतर्गत जांभा दगड व काँक्रीट पायवाटा,नवीन विहीर योजना तसेच गाव चावडी बैठक आणि बोअरवेल आदी विकास कामांचा भूमिपूजन व उद्धाटन समारंभ पार पडला. याप्रसंगी तालुकाप्रमुख निलेश अहिरे, अनिल मालुसरे, अनिल दळवी, लक्ष्मण मोरे तसेच विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.