इयत्ता दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आनंदी वातावरणात सुरू
सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम •
सु. ए. सो. चे के. आ. बांठीया माध्यमिक विद्यालय पनवेल केंद्र ७५३१ याठिकाणी इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षा २०२१/२२ ची परीक्षा दिनांक १५ मार्च रोजी मोठ्या आनंदी वातावरणात सुरू झाली.
परीक्षेला केंद्रावर येताना प्रत्येकाकडे पाण्याची बॉटल, स्यानेतराईज बॉटल, नाका तोंडाला मास्क लावून आनंदात येताना दिसत होती.

के.आ. बांठीया चे प्राचार्य भगवान माळी यांचे मार्गद्शनाखाली ७५३१ केंद्राचे केंद्र प्रमुख तथा उपप्राचार्य छगन तिरमले, उपकेंद्र प्रमुख पर्यवेक्षक बापूराव महाजन, उपकेंद्र प्रमुख पर्यवेक्षक जालिंदर कुंभार, अजित गोखले, स्टेशनरी प्रमुख विजयकुमार, प्रेस कंडक्टर अशोक आंबरे, विजय बडगुजर परीक्षा विभागाचे काम पाहत आहेत. सर्व पर्यवेक्षक
के.आ. बांठीया परीक्षेस बसलेले विद्यार्थी ३४७, उपकेंद्र सु. ए. सो. रात्र शाळा २६, नेरे हायस्कूल भाग विहिघर ७४, विजय आर्मी चिखले ४७ अशाप्रकारे एकूण ४९३ विद्यार्थी मराठी विषया साठी परीक्षेस बसले आहेत. पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment