Press "Enter" to skip to content

आदिवासी उत्थान अभियानाचा समारोप

आदिवासी उत्थान अभियानअंतर्गत सवाद गावातील आदिवासी बांधवाना शासकीय दाखले

सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •

रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यात आदिवासी उत्थान अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग व तहसील कार्यालय पोलादपूर, पंचायत समिती पोलादपूर, कृषी विभाग पोलादपूर, आरोग्य विभाग पोलादपूर व स्वदेस फांउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सवाद गावातील शंकर मंदिर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आदिवासी अभियान सप्तसुत्री समारोपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी पोलादपूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार समीर देसाई, मंडळ अधिकारी मुंडेकर, तलाठी गिमेकर मॅडम, कृषी पर्यवेक्षक भरत कदम, कृषी सहाय्यक बरकडे, पोलादपूर ग्रामीण रुग्णालय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सलागरे व सहकारी, महा ई सेवा केंद्र अधिकारी, रेशन विभाग पुरवठा अधिकारी लाड मॅडम व पाटिल साहेब,आदिवासी समाजाचे पोलापूर तालुका अध्यक्ष-मुकणे, ग्रामसेवक वानखेडे व उमेश मनवे, सवाद माध्यमिक विद्यालय दत्ता उतेकर, सवाद ग्रा.पं. सरपंच सुरेखा गुडबाडकर, तंटामुक्त उपाध्यक्ष शौकत तारलेकर, माजी सरपंच रशिदा तारलेकर,समाजसेवक उमेश कालेकर, सयाजी मांढरे,आशा सेविका अनिता मांढरे,माटवण ग्रा.पं. सरपंच सागवेकर, गाव विकास समिती सवाद अध्यक्ष भाई गुडबाडकर, अशोक वाळणकर, स्वदेस फांउडेशन समन्वयक संदिप शिगवण त्याचप्रमाणे आदिवासी बंधु व नागरीक उपस्थित होते.

आजच्या मेळाव्यामध्ये जातीचे दाखले, रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, नवीन रेशन कार्ड, कोविड-19चा पहिला व दुसरा डोस, उत्पन्नाचे दाखले, आयटीसीटी टेस्ट, सीबीसी, जॉब कार्ड इत्यादी योजनांचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आबा जगताप यांनी केले व प्रस्तावना व स्वागत शौकत तारलेकर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार उतेकर यांनी मानले.

रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान व सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी पोलादपूर तालुक्यातील सडवली गावातील आदिवासी वाडी समाजमंदिरामध्ये सडवली, देवपूर, गांजवणे, खडपी, भोगाव, पैठण, कोंढवी येथे आणि दुसरा कार्यक्रम मंगळवार, दि. 22 फेब्रुवारी 2022 रोजी केवनाळे, करंजे, साखर, देवळे येथील कातकरी महिला व पुरूषांचे एकत्रितपणे कातकरी उत्थान शिबिर पितळवाडी गावातील राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहामध्ये तसेच लोहारे येथील शंकरमंदिरामध्ये लोहारे, पार्ले, तुर्भे व दिविल येथील कातकरी उत्थानाचा तिसरा कार्यक्रम, चौथा कार्यक्रम गुरूवार, दि. 3 मार्च 2022 रोजी कापडे बुद्रुक येथील ग्रुपग्रामपंचायत कार्यालयामध्ये कापडे बुद्रुक, रानबाजिरे, चांभारगणी व आड येथे झाला तर या कार्यक्रमांची सांगता सवाद येथील शंकरमंदिरामध्ये सवाद, माटवण आणि हावरे येथील आदिवासी वाडीतील कातकरी महिला व पुरूषांना कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत विविध आरोग्य तपासण्या तसेच लसीकरणासह महसुल विभागाकडून देण्यात येणारे विविध दाखले, मनरेगा जॉब कार्ड तसेच कातकरी कुटूंबांच्या रेशनकार्ड संबंधित कामे करून झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.