कुर्डुस जिल्हापरिषद मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणार : सौ.मानसी दळवी
सिटी बेल • नागोठणे • याकुब सय्यद •
मागील अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे असलेल्या जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघाचा विकास रखडला होता. शिवसेनेच्या माध्यमातून आ. महेंद्र दळवी आणि तालुका प्रमुख राजा केणी यांनी येथे अनेक विकासकामे राबवली आहेत. तळागाळातील नागरिकांचा शिवसेनेवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत असून विकासकामांच्या आधारे कुर्डुस मतदार संघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार, असा विश्वास जिल्हा परिषदेमधील शिवसेनेच्या पक्षप्रतोद मानसी दळवी यांनी व्यक्त केला.
कुर्डुस मतदार संघातील सांबरी येथील नळपाणी योजनेचे उद्घाटन मानसी दळवी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पाणी पाजण्यासारखे दुसरे पुन्य नाही. हे भाग्य आम्हाला मिळाले, अशा भावना वक्त करताना येथील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवल्याचेही समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. कुर्डुस परिसरात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. एका बाजूला औद्योगिक पट्ट्यासाठी मुबलक पाणी असताना नागरिकांच्या घशाची कोरड संपत नव्हती. अशा परिस्थितीत आमदार महेंद्र दळवी यांच्या स्थानिक विकास निधीतून सांबरी तेथे पाणी पुरवठा योजना शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी पाठपुरावा पुर्ण करुन घेतली. पाठपुराव्यात सातत्य असेल तर कोणतीही योजना सुरु होण्यास वेळ लागत नसल्याचे म्हणत मानसी दळवी यांनी राजा केणी यांच्या पाठपुराव्याचे आणि सामान्य नागरिकांसाठी केल्या जाणाऱ्या घडपडीचे कौतुक केले. काही दिवसांपुर्वीच मानसी दळवी यांनी कुर्डुस मतदार संघातील विकास योजनांसाठी नीधी कमी पडु दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण समीकरणामुळे कुर्डुस मतदार संघातील मतदारांचा शिवसेनेवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत या मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकणार, असा दृढ विश्वासही मानसी दळवी यांनी बोलून दाखवला.
कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघातील सांबरी येथे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे उदघाटन करताना जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ.मानसीताई दळवी, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी,उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील,विभाग प्रमुख योगेश जुईकर,शैलेश पाटील,कुर्डूस ग्रामपंचायत सदस्या सौ.छाया पिंगळे, तुषार शेरमकर, प्रमोद पाटील,जीवन पाटील,आप्पा पिंगळे,युवासेना अधिकारी अक्षय पाटील,शाखा प्रमुख राजा पाटील,उपशाखा प्रमुख स्वप्निल पाटील तसेच सुरेकांत केणी गिरीधर थळे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.








Be First to Comment