Press "Enter" to skip to content

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडू, देवदूत आणि पत्रकारांचा सन्मान

ज्या ठिकाणी एन डी आर एफ, एस डी आर एफ ची टीम पोहचू शकली नाही, तिथं महेश सानप च्या रेस्क्यू टीमने देवदूत बनुन बचावकार्य केले: खासदार सुनिल तटकरे यांनी केले कौतुक

सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत •

ज्या ठिकाणी एन. डी.आर एफची टीम पोहचू शकली नाही, तिथं महेश सानप व रेस्क्यू टीमने जीव धोक्यात घालून देवदूत बनून बचावकार्य केले असे कौतुक खासदार सुनिल तटकरे यांनी केले. खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडू, देवदूत आणि पत्रकारांचा सन्मान केला यावेळी ते बोलत होते.

खा.तटकरे पुढे म्हणाले की रायगड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली त्याठिकाणी महेश सानप ची रेस्क्यू टीम पोहचली व मदतकार्य केले. महाड व पोलादपूर तालुक्यात आलेल्या आपत्तीत व महापुरात महेश सानप च्या रेस्क्यू टीमने मोठे काम केले. एन डी आर एफ व एसडी आर एफ च्या तोला मोलाचे काम आपली रेस्क्यू टीम करीत आहे. आदीतीताई राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. क्रीडा खाते तुमच्या हातात आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील आदीतीताई यांचे ऐकतात, महेश सानप च्या रेस्क्यू टीम चा राज्य सरकारकडून यथोचीत गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना खा. तटकरे यांनी केली.

कबडडी हा तांबड्या मातीतील मर्दानी खेळ असून रायगड जिल्ह्याला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाते. रायगडच्या मातीतील खेळाडूत आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची धमक असल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या काळात जिल्ह्यात राज्यस्तरीय व राष्ट्रीय कबड्डी सामने भरविले जातील अशी ग्वाही देखील खा. तटकरे यांनी दिली.

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोलाड आंबेवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार आणि भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी ते बोलत होते.

या कबड्डी सामन्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून १६ नामवंत महिला कबड्डी संघांनी हजेरी लावली होती. यावेळी चुरसपूर्ण व दर्जेदार सामने पहावयास मिळाले. यावेळी कोरोनाच्या काळात आणि महापुरात जीवावर उदार होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व लेखणीच्या माध्यमातून सर्व हितगूज माहिती घरोघरी पोहोचवणाऱ्या मीडिया पत्रकार तळा तालुक्यातील महाराष्ट्र अष्टपैलू सागर कातुर्डे, कोरोनाच्या काळात देवदूत बनून काम करणारे राजेश मटकर २७ जुलै च्या महापुरात घरोघरी जाऊन रेस्क्यू करून सर्व जणांना सुखरूप स्थळी पोहोचवण्याचे काम करणारे जीवाची पर्वा न करणारे महेश सानप आणि त्यांचे सहकारी अशा सर्वांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचा केक सुद्धा या ठिकाणी कापण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी कबड्डी असोसिएशनचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आस्वाद पाटील, राष्ट्रवादीचे मधुकर पाटील, वर्धाताई तटकरे, जे जे पाटील सर, पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष गीता पालरेचा , महिला अध्यक्ष प्रीतमताई पाटील, रोहा प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने, उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, कोलाड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव ,महेंद्र शेठ पोटफोडे ,राकेश शिंदे , आदिसह असंख्य ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने कबड्डी रसिक महिला, पुरुष या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विजेत्या संघाला पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.