Press "Enter" to skip to content

विरेंद्र म्हात्रे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर

सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे •

स्वतंत्र संपादक पत्रकार संघ या संस्थेच्या माध्यमातुन राजकिय, सामाजिक,सहकार,सांस्कृतिक,कला-क्रिडा,उद्योग,शिक्षण या विविध क्षेत्रामध्ये काम करणार्या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे काम हि संस्था करत आहे.व्यक्ति आणी संस्था यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देवुन त्यांच्या कार्याला बळ देण्याचे काम हि संस्था करत आहे. संस्थेचे पुरस्कार देण्याचे हे पहिले वर्ष आहे.

महाराष्ट्रातील विविध भागातुन पुरस्करासाठी अर्ज मागविण्यात आले होते.या मध्ये नेरूळ मधील लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांचे कार्य प्रभावीपणे संस्थेच्या निदर्शनास आले म्हणुन त्यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात येत आहे अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष नामदेव शेलार व उपाध्यक्ष गौरव शेलार यांनी दिली.

लवकरच हा सोहळा शनिवार दिनांक २६ मार्च २०२२ रोजि कुणबी होल म्हसारोड मुरबाड. जिल्हा ठाणे या ठिकाणी आयोजित करून सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहे अशीही माहीती त्यांनी दिली.

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सर्वच स्थरातुन त्यांचे कौतुक होत आहे.नेरुळ गांवातील नागरीकांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.