Press "Enter" to skip to content

“पेणकर नारी सन्मान” सोहळा

पेण शहरातील बाफणा ज्वेलर्सच्या वतीने नारी सन्मान सोहळा संपन्न

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

जागतिक महिला दिनानिमित्त पेण शहरातील बाफणा ज्वेलर्सच्या सर्वेसर्वा लीना विशाल बाफणा आणि विशाल महेंद्रकुमार बाफणा यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा “पेणकर नारी सन्मान” सोहळा गांधी मंदिर येथील पटांगणावर आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिला पोलीस उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, जिल्हा परिषदेच्या सभापती ॲड. निलिमा पाटील, कोरोना काळात अहोरात्र रुग्णांना सेवा देणाऱ्या डाॅक्टर्स श्रावणी गोडबोले, लता फडतरे, सोनाली वनगे, महनंदा म्हात्रे तर नगरसेविका ॲड. तेजस्विनी नेने, प्रतिभा जाधव, वसुधा पाटील यासह सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी गाडगीळ, स्वाती मोहिते, वैशाली पाटील, नंदा म्हात्रे, मोहिनी गोरे, उद्योजिका प्राजक्ता वनगे व लावणी सम्राज्ञी सोनाली पवार,अगंणवाडी सेविका ज्योती गायकवाड, मन्नत बचत गटाच्या मुस्कान झटाम आदिंसह इतरही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या करणाऱ्या महिलांना यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन बाफणा कुटुंबियांच्या वतीने पेणकर नारी सन्मान यांने सन्मानित करण्यात आले.

तर सदर कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी बाफणा ज्वेलर्स तर्फे लकी ड्राॅ चे देखील आयोजन केले होते.शेवटी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये रामवाडी येथील संध्या विनायक पाटील यांना सोन्याची अंगठी लागली असता मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही गौरव करण्यात आला.तर लकी ड्रॉ सोन्याची नथ, कानातले, अंगठी अशा मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या.

या कार्यक्रमाला बाफणा ज्वेलर्सचे कुटुंबीय महेंद्रकुमार बाफणा, फेनसीबाई बाफणा, रंजीत बाफणा, सरोज बाफणा, मिना बाफणा, जिनल बाफणा, विशाल बाफणा, जियान बाफणा, पाली नगराध्यक्षा गीता पालेरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद भगत, सह्याद्री प्रतिष्ठानचे समीर म्हात्रे,सुचिता चव्हाण, ॲड. प्रमोद कांबळे, ॲड. वैशाली कांबळे, नगरसेवक मंगेश पेडामकर, पांडुरंग जाधव, विवेक जोशी आदिंसह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.