Press "Enter" to skip to content

जागतिक महिलादिनी गौरव

आरोग्य सहाय्यीका स्वप्नजा देशमुख यांचा उत्कृष्ट महिला कर्मचारी म्हणून सन्मान

सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत •

जागतिक महिला दिनी समाजात व आपल्या कार्यालयीन कामकाजात उल्लेखनीय व लोकहितार्थ काम करणाऱ्या पालीतील महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

पाली पंचायत समिती कार्यालयात तहसील कार्यालय पाली, पंचायत समिती सुधागड, पाली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहायिका श्रीमती स्वप्नजा देशमुख यांचा पाली तहसीलदार दिलीप रायन्ना वार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सायली मानकर,(उत्कृष्ट अधिकारी) वैद्यकीय अधिकारी डॉ.स्मिताराणी खिलारे (उत्कृष्ट अधिकारी)आरोग्य सहाय्यीका श्रीमती स्मिता सानप (उत्कृष्ट कर्मचारी) यांचा देखील सन्मान करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्ण व नागरिकांना अधिकाधिक उत्तम व जलद प्रकारची आरोग्य सेवा देण्याचे काम येथील कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून होत आहे. कोव्हिडं 19 च्या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देण्याचे काम देखील या टीमने केले.

याबरोबरच शासनाच्या आरोग्यविषयक योजना व उपक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आरोग्य विभागाची टीम जबाबदारीने पार पाडत आहे. भविष्यात देखील या टीमकडून अशाचप्रकारे जनसेवा घडावी या उद्देशाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना गोरविण्यात आले.

यावेळी पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, गटविकास अधिकारी विजय यादव, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मढवी, पोलीस निरीक्षक विश्वजित काईनगडे, नायब तहसीलदार वैशाली काकडे, राष्ट्रपती पदक विजेत्या ताराबाई सकपाळ आदींसह मान्यवर, अधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.