Press "Enter" to skip to content

जागतिक महिला दिन बेणसे ग्रामपंचायत तर्फे साजरा

सिटी बेल • नागोठणे • याकूब सय्यद •

पेण तालुक्यातील बेणसे ग्रामपंचायत जागतिक महिला दिवस म्हणून ग्रामपंचायत समोर साजरा करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी सौ मानसी दळवी, बेणसे ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर पारधी, उपसरपंच राजेश मोरे, माजी सरपंच सौ प्रीती उद्धव कुथे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महिलांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिवस साजरा होत असताना या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात ज्या महिलांनी प्रथम क्रमांक दृतिय व तृतीय क्रमांक पटकाविले त्यांना सौ. मानसी दळवी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

महिलांनी सक्षम व्हावे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यां महिलांनी पुरुषांसारखे पुढे यावे महिलांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. आजही महिला असुरक्षित असल्याने महिलांवर अत्याचार दिवसा ना दिवस वाढत आहेत अशी खंत सौ मानसी दळवी यांनी जागतिक महिला दिनी महिलांसमोर आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, आमचे जनक सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडे केले सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने महिलांना जाणीव करून दिली कि एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकते अशी चांगली दिशा सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिली असताना महिलांनी आता तरी पुढे यावे शासनाने पुरुष स्त्री असे दोघांना समानतेचा अधिकार दिलेला आहे त्याचा महिलांनी फायदा घेऊन स्वतः सक्षम बनावे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.