Press "Enter" to skip to content

एम एस आर डी सी ला हुतात्म्यांचे विस्मरण

सगुणा बाग ऐवजी “हुतात्मा हिराजी पाटील स्मारक” हे नाव देण्याची केली होती मागणी

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत मुरबाड रोड वरील कळंब पोही येथील एम एस आर डी सी (M.S.R.D.C.) ने लावलेल्या शासकीय फलकावरील सगुणा बाग या नावाच्या जागी हुतात्मा हिराजी पाटील स्मारकाकडे असे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सागर शेळके यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

एम एस आर डी सी बांद्रा -मुंबई येथील कार्यकारी अभियंता यांना सागर शेळके यांनी पाठवलेल्या पत्रात भारतीय स्वातंत्र्य लढ्या मध्ये ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली,इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या आपल्या निधड्या छातीवर घेतल्या,असे “हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या मूळ गाव “मानिवली ” येथे कर्जत तालुक्याची अस्मिता असणारे हुतात्मा हिराजी पाटील स्मारक हे नेरळ कळंब रोड वर असून,सदर कळंब पोही रोड वर लावण्यात आलेल्या शासकीय सूचना बोर्डा वर सगुणा बाग हे नाव दिले आहे.

त्या ठिकाणी “हुतात्मा हिराजी पाटील स्मारका कडे “असे नाव देण्यात यावे, असे पत्र देण्यात आले आहे, येणाऱ्या वीस दिवसा मध्ये हे नाव बदले नाही गेले तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.