Press "Enter" to skip to content

गर्मी सहन होईना…

उकाडा जाणवू लागेल्यामुळे कलिंगड, शितपेय,ज्युस यांना वाढती मागणी
               

सिटी बेल • कोलाड • विश्वास निकम •
             

मार्च महिना सुरु होताच खऱ्या अर्थाने हळूहळू  उन्हाळा जाणवू लागला असून निरभ्र आकाश आणि कोरडा वातावरण यामुळे गर्मी जाणवू लागल्यामुळे यापासून शरीराचा दाह कमी करण्यासाठी नागरिक कलिंगड, शितपेय,ज्युस यांना पहिली पसंती देत असून यामुळे यांची मागणी वाढली आहे.                 

दररोज लावण्यात येणारे वणवे, वाढते प्रदूषण व सततचा होणाऱ्या  पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे राने वने ओस पडू लागली असून रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या तापमाणामुळे नागरिक पूर्णपणे हैराण होत आहेत यामुळे शरीराला गारवा मिळवण्यासाठी कलिंगड, ज्युस, शितपेय याकडे लोकांचा कल वाढतांना दिसत आहे.                    

मार्च महिन्याच्या सुरुवातीला आताच उन्हाचा पारा ३८ अंशापेक्षा वर गेला असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत असून अशा परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी कलिंगड, लिंबू सरबत, ऊसाचा रस, लस्सी, नागरिक याचा आधार घेतांना दिसत आहेत.      

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.