Press "Enter" to skip to content

विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव

दिलासा फाउंडेशनकडून महिलादिनी रणरागिणी पुरस्कार वाटप

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

जागतिक महिला दिनानिमित्ताने दिलासा फाऊंडेशन खालापूरतर्फे डाॅक्टर संगीता प्रमोद वानखेडे, शितल गायकवाड आणि क्षमा घनश्याम आठवले यांचा रणरागिणी पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

दिलासा फाऊंडेशन खालापूर विविध सामाजिक उपक्रम राबवत असून दरवर्षी महिला दिनाला विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. यंदा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत नगरपरिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर संगीता वानखेडे यांचा रणरागिणी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

कोव्हिड काळात तसेच मुलांचे लसीकरण मोहीम उत्कृष्टरित्या खोपोली नगरपरिषदेच्या डाॅक्टर वानखेडे आणि सहकारी कर्मचारी यांनी राबवली. क्रिडा क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शितल गायकवाड हिने तालुक्यात महिला, मुलीना कराटे प्रशिक्षण, स्वसंरक्षण माध्यमातून सबला करण्याचे शिवधनुष्य उचलले असून त्याची दखल घेत दिलासा फाऊंडेशन खालापूर तर्फे रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रात कार्यरत, इनरव्हिल क्लब च्या माजी अध्यक्षा क्षमा आठवले यांनी खालापूर कोव्हिड केंद्रात मोफत सेवा दिली होती. याशिवाय नगरपंचायत सफाई कामगार यांचे आरोग्य सदृढ राहवे यासाठी औषध वाटप याकडे सातत्याने लक्ष दिले होते. आठवले यांचा खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभुते, महिला पोलीस उपनिरीक्षक सरला काळे यांच्या सह पोलीस महिला पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

रणरागिणी पुरस्कार वितरण प्रसंगी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, राजू अभाणी, दिनेश गुरव, जेष्ठ पत्रकार जयवंत माडपे, दिनकर भुजबळ, संदीप ओव्हाळ, प्रसाद अटक, विकी भालेराव ,दिलासा फाऊंडेशन संस्थापक मनोज कळमकर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.