शिहू गावच्या रहिवाशी रंजना म्हात्रे यांना रायगड भूषण पुरस्कार प्रदान
सिटी बेल • मंजुळा म्हात्रे • शिहू •
रायगड जिल्हातील मानाचा समजला जाणारा रायगड भूषण पुरस्कार शिहू गावच्या ख्यातनाम गायिका रंजना परशुराम म्हात्रे यांना जिल्हापरिषद सदस्या नीलिमा पाटील, चित्रा पाटील, पेण पंचायत समिती सभापती मनीषा भोईर, युवा नेते प्रसाद भोईर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
रंजना म्हात्रे यांनी आपल्या लोककलेतून व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री पुरुष एकसमान, हुंडाबली इत्यादी आपल्या गीतातून समाजात जनजागृती केली आहे.
एक सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेला मिळालेल्या या पुरस्कारा मुळे शिहू पंचक्रोशीत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment