Press "Enter" to skip to content

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान

डॉ.शिवदास कांबळे रायगड जिल्हा परिषदेच्या रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल • अलीबाग •

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तींना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. रायगड भूषण हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे हा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्तीकडून रायगड जिल्ह्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभामध्ये राज्याच्या उद्योग पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केली.

पनवेल महानगर पालिकेचे माजी नगरसेवक आणि एक अभ्यासू राजकारणी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन प्राप्त व्यक्ती डॉ. शिवदास कांबळे यांना आज अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कुमारी योगिता पारधी महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील माजी आमदार पंडित पाटील विद्यमान आमदार बाळाराम पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.