राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देवरे विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन
सिटी बेल • रामकृष्ण पाटील • नंदुरबार •
नंदुरबार तालुक्यातील श्री.आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाला विखरण गावाचे उपसरपंच सौ.सुनिताबाई चंदू पवार तसेच गावातील निकीता राजू पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विज्ञान शिक्षक एम.डी.नेरकरांनी प्रास्ताविक करून विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले.

विदयालयात चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी विज्ञान कथा, विज्ञान कोडे, वैज्ञानिक सुत्रे, रासायनिक अभिक्रिया, प्रश्नमंजुषा, विज्ञानातील गमंती सादर केल्या तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन डॉ.सी.व्ही. रमण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी डॉ.सी.व्ही. रमण ते डॉ.ए.पि.जे. कलामांपर्यंतची वैज्ञानिक संशोधनपर इतिवृत्त विद्यार्थ्यांसमोर मांडले.इ.१०वी च्या कु.रुचिता मराठे,भूमिका पाटील यांनी सुत्रसंचालन तर आभार कु.वैष्णवी पाटील हिने मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक के.पी.देवरे, डी.बी.भारती, एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल, श्रीम.एस.एच.गायकवाड, व्ही.बी.अहिरे,आर.एम.पाटील,श्रीम.एम.आर.भामरे,एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.













Be First to Comment