Press "Enter" to skip to content

कोयना प्रकल्पग्रस्त शिवाजीराव मोरे यांचा सन्मान

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

रायगड,ठाणे,पालघर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्त जनतेचे व कोयना क्षत्रिय मराठा समाजाचे सरचिटणीस शिवाजीराव मोरे यांचा नुकताच गौरव करण्यात आला.

शिवाजीराव शंकरराव मोरे हे कोयना प्रकल्पग्रस्त असून व्यवसाय निमित्ताने ते ठाणे येथे वास्तव्यास आहेत,रायगड, ठाणे,पालघर, सातारा,रत्नागिरी जिल्ह्यातील कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संस्था यांचे सरचिटणीस असून प्रकल्पग्रस्त जनतेच्या नागरी हक्क मिळवून देण्यासाठी व ठाणे शहरातील विविध संस्था येथे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करीत असतात.त्यांच्या विविध प्रकारच्या सामाजिक कामाची उल्लेखनीय दखल घेऊन ठाणे महानगरपालिका यांनी त्यांचा ठाणे गुणिजन पुरस्कार महापौर नरेश म्हस्के,खासदार राजन विचारे,आयुक्त विपीन शर्मा यांच्याहस्ते प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.