Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेची विविध विकासकामे

कर्जत नगरपरिषद हद्दीत रस्त्याचे भूमिपूजन व पथदिवे, ओपनजीम चा लोकार्पण सोहळा संपन्न

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत नगरपरिषद हद्दीत एका कामाचे भूमिपूजन तर दोन कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला सदर कामे नगर विकास विभाग आणि नगरपरिषद फंडाच्या माध्यमातून करण्यात आली आहेत.

कर्जत नगरपरिषद हद्दीत शिवम कॉम्प्लेक्स ते फायर ब्रिगेड येथील रस्ता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये खर्च करून बनविण्यात येणार आहे, त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.तर मुद्रे बुद्रुक येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1 कोटी रुपये खर्च करून नवीन बसवलेल्या पथदिव्यांचा स्ट्रीट लाईटचे तसेच कचेरी रोड मुद्रे बुद्रुक येथील ओपन जिम परिसरात नगरपरिषद फंडातून 16 लाख रुपये खर्च करून पेवर ब्लॉक आणि इतर सुशोभीकरण करण्यात आले या दोन कामाचे लोकार्पण सोहळा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आला.

# रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना खासदार श्रीरंग बारणे याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी

याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका भारती पालकर, सुवर्णा निलधे, प्राची डेरवणकर, संचिता पाटील, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, वैशाली मोरे, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळींबकर, उमेश गायकवाड, संकेत भासे, हेमंत ठाणगे, भाई गायकर उपस्थित होते.

मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.राहुल डाळींबकर यांनी शिवसेना, भाजपा आणि आरपीआय ही तीन मुले खासदारांना आहेत, त्यापैकी शिवसेना मोठा मुलगा असल्याने त्यावर खासदार यांचे जास्त प्रेम आणि त्यानंतर भाजपा वर आणी सर्वात कमी प्रेम आरपीआय वर आहे असे सांगून नगरपरिषद क्षेत्रात पाणी आणि अजून काही समस्या आहेत याकडे खासदार आणि आमदार यांचे लक्ष वेधले.

# मुद्रे येथील ओपन जिम चे लोकार्पण करताना खासदार श्रीरंग बारणे याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी

आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्यांमध्ये शिवसेनाप्रणीत आघाडीचे सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघात आता खर्‍या अर्थाने विकास कामाला सुरुवात झाली आहे असे सांगितले.खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वाधिक निधी कर्जत तालुक्याला मिळाला आहे सांगितले.

याप्रसंगी शिवसेना,भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.