सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे
संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने पँनोरमा पाँईट येथे कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता अतिशय मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम दि.३ रोजी माथेरानकराच्या प्रतिनिधी म्हणून माथेरानच्या कार्यकुशल नगराध्यक्षा उत्तम प्रशासक प्रेरणा सावंत यांच्या शुभहस्ते व वनसमितीचे अध्यक्ष योगेश जाधवयांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम ,समितीच्या सदस्या विनंती घावरे, सविता कारंडे, सुहासिनी शिदे, सदस्य सिताराम शिदे , राहूल बिरामणे तसेच वनसरक्षक अधिकारी राठोड , वनक्षेत्रपाल शंकर पवार, मोरै , मराठे सर्व फाँरेस्ट नाका कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पँनोरामा पाँईट परिसरात किमान ४०० वृक्षांची लागवड करणेत आली.
नुकताच ३ जून रोजीच्या निसर्ग चक्री वादळात असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे माथेरानला सध्यातरी वृक्षारोपणची खऱ्या अर्थाने गरज आहे त्यासाठी दि.३ जुलै रोजी
संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने ही वृक्षारोपणाची सुरुवात झाली आहे.
Be First to Comment