Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये लोकन्यायालय

12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे कर्जतमध्ये आयोजन

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्याकडे नियोजित कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड, तालुका विधी सेवा समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक न्यायालय मध्ये न्यायालयातील प्रलंबित व वाद अपूर्व खटले तसेच बँका, वित्तीय संस्था, बीएसएनएल, वीज वितरण कंपनी, नगर परिषद व ग्रामपंचायती कडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवून निकाली काढली तर वेळेचा होणारा अपव्यय टाळता येईल अशी माहिती कर्जत दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष न्यायाधीश एम. व्ही. तोकले यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.