उरण पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी कोरोना पाॅझीटिव्ह
सिटी बेल लाइव्ह / उरण /सुभाष कडू
उरण पंचायत समिती कार्यालयात एक कर्मचारी कोरोना पाॅझीटीव्ह सापडल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामूळे कार्यालयातील ईतर कर्मचार्यांना कोरोना संसर्गाची लागण होवू नये म्हणून पं.स.कार्यालय 7 व 8 तारखेला बंद ठेवण्याचा निर्णय गटविकास अधीकारी निलिमा गोडे यांनी घेतला आहे.त्यासंधर्भात त्यांनी पत्रक काढून सर्व उरण मधील ग्रामपंचायतींना कळवलं आहे.
उरण तालुक्यात गेल्या काही दिवसात करोना झपाट्याने वाढू लागला आहे.तसेच अपूर्या वैद्यकीय सेवेमूळे रुग्णांना उपचार करणे कठीण जात आहे.अशातच नवी मुंबई व पनवेल येथील दवाखान्यांमध्येही जागा उपलब्ध नसल्याने उरण करांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामूळे कोरोनावर आळा घालने हेच आत्ता उरणकरांच्या हाती उरले आहे.त्यामूळे उरण पंचायत समीतीमध्ये एका कर्मचार्याला कोरोना रुग्ण सापडल्यामूळे पंचायत समीती कार्यालय बंद करण्याचा निर्णय पंचायत समिती प्रशासनाने घेतला आहे.दि.7 व दि.8 रोजी कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे.व या दरम्यान संपूर्ण कार्यालय सुरक्षेच्या दृष्ठीने सॅनेटराईज करण्यात येणार आसल्याचे गटविकास अधिकारी निलीमा गोडे यांनी सांगितले.
Be First to Comment