आमदार बाळाराम पाटील यांच्या दौऱ्यातील २३ वी “शिक्षक संवाद सभा” भाईंदर सेकंडरी शाळा येथे संपन्न
सिटी बेल • भाईंदर •
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने कोकण शिक्षण मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मिरा भाईंदर येथील सेकंडरी शाळेत ” शिक्षक संवाद ” सभेचे आयोजन केले होते त्यास उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

सभेस उपस्थित आमदार बाळाराम पाटील, शेकाप पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, इंडियन हायस्कुल चे चेअरमन साजिद आसिफ पटेल, संचालक जक्की आसिफ पटेल, मा. महापौर निर्मला सावळे सेकंडरी शाळेचे मुख्याध्यापक सरोदे सर, संचालक रमेश गायकवाड, अजित पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळेस शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. भाईंदर सेकंडरी शाळेचे प्राचार्य सरोदे यांनी आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले. आमदार बाळाराम पाटील आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्व ७ शिक्षक आमदारांना एकत्र आणण्याचे काम बाळाराम पाटील यांनी केले असे उद्गार सरोदे यांनी काढले. आमदार बाळाराम पाटील यांच्या निधीतून भाईंदरमधील बऱ्याच शाळांना आलेल्या निधीची माहिती त्यांनी सांगितली.

बाळाराम पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये कायम शिक्षकांसोबत असल्याचे नमूद केले. शिक्षणामधील एकूण परिस्थिती पाहता सुधारणा व्हावी म्हणून मी लाच देणार नाही ही भूमिका सर्व शिक्षकांनी घ्यावी लागेल असे प्रतिपादन आमदार बाळाराम पाटील यांनी केलं.













Be First to Comment