हॉटेल व्यवसायिकांना हॉटेलमध्ये गॅस लिक डिटेक्टर बसविण्याचे आदेश… अन्यथा होणार कारवाई !
सिटी बेल | पनवेल |
कामोठे वसाहतीमधील सेक्टर 11 मधील स्वतीक प्लाझा सोसायटी मधील भोजनालयाला मध्ये आग लागल्याची घटना घडल्या नंतर, सिडको आणि पनवेल महानगरपालिका अग्निशमन दल आता आक्रमक झाली आहे. अग्निशमन दलाने पालिका हद्दीतील 135 हॉटेल व्यावसायिकांना नोटीस बजावून lp गॅस सिलेंडर बाबतीत आवश्यक त्या सुरक्षा उपाय योजना कराव्या अश्या नोटीस बजावल्या आहे. तसेच हॉटेल परिसरात गॅस लिक डिटेक्टर बसवण्याचे आवाहन अग्निशमन दलांनी केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
कामोठे शहरामध्ये 1 फेब्रुवारीला रात्री 7 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 11 मधील स्वस्तिक प्लाझा इमारतीच्या आवारात असलेल्या खानावळीत दोन सिलेंडर चा स्फोट होऊन, अक्राळ विक्राळ अशी आग लागली होती, या आगी मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र दोन दुकाने आणी पहिल्या मजल्यावरील दोन घरे जळून खाक झाली आहेत. या मध्ये लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. ही आग लागल्या नंतर सिडको आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली त्या नंतर आग का लागली याचा शोध घेतल्या नंतर सिलेंडर लिक होऊन आग लागल्याचे प्रथमदर्शनीय समोर आले आहे.
सिलेंडर लिक झाल्याने आग लागली आणि एका पाठोपाठ दोन सिलेंडर चा जागेवर स्फोट झाला आणि आग अधिक भडकत गेल्याचे सांगितले जात आहे. आग शांत झाल्या नंतर, अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी स्फोटात दोन तुकडे झालेले, दोन सिलेंडर आणि, अन्य दोन ते तीन सिलेंडर मिळून आले होते. अशी भयावह अवस्था त्या वेळेस घटनास्थळी होती, अग्निशमन दलाच्या जवानांमुळे, आग आटोक्यात आणली गेले अन्यथा मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती, ही आग लागल्या नंतर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत.
या भोजनालय व्यावसायिकांनी हॉटेल चा परवाना देखील घेतला नसल्याचा सूर घटना स्थळी होता, तसेच अग्निशमन दलाची कोणतीही परवानगी या सोसायटी धारकांनी आणि भोजनालय मालकांनी घेतली नसल्याचे सांगितले जात आहे. त्या मुळे प्रशासनाच्या कार्यभरावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. आगीची घटना घडल्या नंतर अग्निशमन दलाने 2 फेब्रुवारी पालिका हद्दीत असलेल्या 135 हॉटेल व्यवसायिकांना नोटीस बजावून सुरक्षित उपाय योजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हॉटेल मध्ये गॅस लिक डिटेक्टर बसवा असे आवाहन अग्निशमन मुख्य अधिकारी विजय राणे यांनी केले आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
पालिका हद्दीत 135 हॉटेल व्यावसायिक नोंदणीकृत पनवेल महानगरपालिका हद्दीत चार मोठ्या सिडको वसाहतीसह 29 ग्रामपंचायती चा समावेश होतो, अश्या मोठा परिसर असलेल्या पालिका हद्दीत केवळ 135 हॉटेल व्यवसायिकांनी नोंदणी केल्या असून अग्निशमन दलाच्या परवानगी घेतल्या आहेत. आणि अन्य शेकडो हॉटेल व्यावसायिक खानावळ, भोजनालये हे परवाना शीवाय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.
Be First to Comment