सिटी बेल | पनवेल |
पनवेल – डहाणू रेल्वे गाडीने प्रवास करताना गुजराती, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून उदघोषित (Announcement) व चलचित्राने( Indicator) उल्लेखित होत असुन यात मराठी भाषा नसल्याचे निदर्शनास आले आहे.
राजसाहेब ठाकरे अध्यक्ष मनसे यांच्या आदेशानुसार व किशोर शिंदे अध्यक्ष जनहित कक्ष व विधी विभाग आणि सौ. आकांक्षा गांधी महाराष्ट्र राज्य चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल रेल्वे स्थानक चे मा. महाप्रबंधक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जनहित कक्ष यांस कडून निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी पक्षाचे नविन पनवेल शहर अध्यक्ष पराग बालड, जनहित कक्ष पनवेल विधानसभा विभाग संघटक वरुण कानडे, महाराष्ट्र सैनिक संचित मोरे, जितेंद्र दामुष्टे आणि ओमकार जागुष्टे हे उपस्थित होते.
Be First to Comment