आशिया खंडातील पहिली प्रवासी इ – रिक्षा धावणार उलवे नोड मध्ये
सिटी बेल | साई संस्थान वहाळ |
रोटरी क्लब ऑफ उलवे नोड ची स्थापना अवघ्या तीन वर्षापूर्वी झालेली आहे.अवघ्या तीन वर्षात या क्लब ने अभिनव आणि वेगळ्या धाटणीच्या उपक्रमांनी आपली छाप पाडली आहे. परिवहन विभागाने मान्यता दिलेली बॅटरीवर चालणारी पहिली रिक्षा रोटरी क्लब च्या माध्यमातून बुधवार दिनांक 19 जानेवारी रोजी कार्यान्वित करण्यात आली.त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे.
वहाळ येथील श्री साई मंदिरा मध्ये रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 3131 से प्रांतपाल पंकज शहा यांच्या शुभ हस्ते आशिया खंडातील पहिल्या वहिल्या बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा ची चावी चालकाला सुपूर्द करण्यात आली.विशेष म्हणजे रोटरी क्लब ऑफ उलवे नोड च्या सदस्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देत सदरची ई रिक्षा कार्यान्वित केली आहे. या कार्यक्रमाला रोटरीच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे समिती सदस्य जयदीप मालवीय, रोटरी चे माजी प्रांतपाल तथा सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ उलवे नोड संस्थापक अध्यक्ष तथा श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, एन आर आय पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अशाप्रकारे ई रिक्षा कार्यान्वित करणे ही काळाची गरज बनली आहे. सदरची वाहने ही कार्बन उत्सर्जित करत नाहीत त्यामुळे त्यांना पर्यावरण प्रेमी समजले जाते. मुबलक प्रमाणात चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून दिल्यास ही वाहने इंधनावरील अतिरिक्त खर्च देखील कमी करू शकतात. आशिया खंडातील पहिली ई रीक्षा कार्यान्वित केल्या बद्दल रोटरी क्लब ऑफ पनवेल नोटवर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे.
रोटरी क्लब ऑफ उलवे नोड चे अध्यक्ष शिरीष कडू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी गेल्या तीन वर्षात रोटरी क्लब ऑफ उलवे नोड करत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर प्रस्तुत केला. यावेळी अन्य रोटरी क्लबच्या अध्यक्ष यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमाला सागर गुंडेवार, डॉ.अनिल परमार, ऊर्जा तज्ञ प्रशांत खांडकोजी,रोटरी क्लब ऑफ पुणे च्या डायरेक्टर ऑफ पब्लिक इमेज क्रांती शाह,
पाताळगंगा रोटरी क्लब अध्यक्ष गणेश काळे, पेण रोटरी क्लब अध्यक्ष सचिन शिगवण,संदीप कांबळे,पुणे रोटरी मिड टाऊन अध्यक्ष विद्यासागर जाधव रोटरी क्लब ऑफ उलवे नवल चे सचिव निलेश सोनवणे,प्रोजेक्ट हेड अमित कुचेरकर, रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलचे अध्यक्ष रवी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ उलवे नोडच्या अनिता रॉय, मनीषा सोनार, पल्लवी सुर्वे, निलेश ठाकूर, मुकुंद थळे, जयेश त्रिभुवन, राहुल वंजारी, सुयोग खरे,प्रितेश म्हात्रे, निलेश म्हात्रे,भूपेश म्हात्रे, सचिन मुळे,विशाल नाईक, शामराव निंबाळकर, श्रद्धा पानमंद, शनिकुमार पाटील, कृष्णा पाटील, मनोहर पाटील, देवेंद्र पाटील, नितीन आढाव, शेखर काशीद, चंद्रकांत खरे, डॉ दिपाली बोरघाटे, रेखा चिरनेरकर यांनी अथक परिश्रम घेतले.
उलवे नोड ने आज इतिहास घडवला आहे,भावी पिढीला दिशा दर्शक असे काम त्यांनी उभारले आहे,त्यांचे मी आभार व्यक्त करतो,कार्बन मुक्त वाहनाचा प्रसार उलवे नोड ने अधिकाधिक करावा अशी अपेक्षा करतो.
– जयदीप मालवीय.
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे,परिवहन खात्याची परवानगी असणारी पहिली रिक्षा धावणार आहे.रोटरी क्लब ऑफ उलवे नोड चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो.
– डॉ गिरीश गुणे
उलवे नोड ने राबविलेल्या प्रत्येक अभिनव उपक्रमास मी उपस्थित राहिलो आहे,आज इंधन किमती प्रचंड वाढत आहेत.ही रिक्षा म्हणजे एक वेळची गुंतवणूक आहे.उलवे नोड मध्ये 300 हून अधिक रिक्षा आहेत,सगळ्या रिक्षा विजेरी वर चलवाव्यात ही माझी इच्छा आहे.तसेच चार्जिंग स्टेशन मुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील. पर्यावरण संवर्धनासाठी आपण सगळ्यांनीच हातभार लावला पाहिजे मी स्वतः घरी सोलर प्रोजेक्ट बसविला आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे मला विजेचे बिल अत्यंत कमी प्रमाणात भरावे लागते.
– रवींद्र पाटील.
पर्यावरण हा महत्वाचा घटक आहे,पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल,रोटरी निश्चित सहकार्य करेल.कर्ज उपलब्ध करून देणे,आधीच्या रिक्षांना उत्तम किंमत मिळवून देणे, परिवहन विभागाचे सहाय्य मिळवून देणे यासाठी रोटरी क्लब परिपूर्ण सहकार्य करेल. शून्याची उत्पत्ती भारतात झाली आहे, त्यामुळे एक या क्रमांकावर जास्तीत जास्त शून्य लावण्याचा प्रयत्न देखील आपल्याला करायचा आहे.आज एक रिक्षा आली आहे,उद्या शंभर,हजार आणि लाख रिक्षा येतील तेव्हा पर्यावरणाचे संवर्धन रोटरी क्लब ऑफ उलवे नोड चे नाव पहिली ई रिक्षा देणारे म्हणून कायम लोकांच्या स्मरणात राहील.
पंकज शहा
Be First to Comment