Press "Enter" to skip to content

जेएसडब्ल्यु च्या कोक प्लॉंटमधील प्रदुषण मच्छीमारांच्या उरावर

दूषित पाण्यामुळे धरमतर खाडीतील मासे मृत्यूमुखी ; आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा कंपनी प्रशासनाला इशारा

सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे |

जेएसडब्ल्यु कंपनीच्या कोक प्लॉंटमधून सोडण्यात येणाऱ्या दूषीत पाण्यामुळे मोठ्याप्रमाणात धरमतर खाडीतील मासे तडफडून मरत आहेत. यामुळे येथील मच्छीमारांचा परंपरागत मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली येथील स्थानिक मच्छीमारांनी आवाज उठवल्याने कंपनी प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी.या संदर्भात अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी बोलावलेल्या बैठकीत धरमतर खाडीतील मच्छीमार, शेतकरी यांच्यासह कंपनीचे अधिकारी देखील उपस्थित होते.

रविवारी काचली, पिटकीरी, चिखली येथील ग्रामस्थांनी खाडीमध्ये प्रत्यक्ष पहाणी करुन प्रदुषणाची ही बाब अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बुधवारी तातडीने बैठक बोलावून कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही चर्चेसाठी येण्यास सांगितले होते. राजमळा येथे झालेल्या बैठकीसाठी जेएसडब्ल्यु कंपनीचे एचआर अधिकारी बळवंत जोग उपस्थित होते. त्यांनी या प्रदुषणाची पहाणी करुन नुकसानग्रस्त मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.
जेएसडब्ल्यु कंपनीतील कोक प्लॉंटमधून प्रदुषीत झालेला गरम पाणी कोणतीही प्रक्रिया न करता खाडीत सोडला जातो. त्यामुळे दररोज हजारो किलोचे मासे या खाडीत मरुन पडत आहेत. कंपनीच्या प्रदुषणामुळे काचली, पिटकीरी, खातीवरे, कातळपाडा, डभेवाडी, कुसुंबळे, वाघविरा, चिखली, हेमनगर या गावातील दीडशे ते दोनशे पारंपारिक मच्छीमार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

ओहटीमध्ये खाडीतील पाणी कमी झाल्यानंतर खाडीच्या किनाऱ्यावर हे मरुन पडलेले दिसून येतात. हे मासे खाण्यास अयोग्य असल्याने त्याचा कोणताही उपयोग होत नाही. खाडीतील मासे पकडून ते बाजारात विकण्याचा येथील कुटुंबियांचा पिढ्यानपिढ्या पारंपारिक व्यवसाय चालत आलेला आहे; मात्र कंपनीतून सोडल्या जाणाऱ्या दूषीत पाण्यामुळे तो संकटात आला आहे. दररोज वाया जाणाऱ्या या मत्स्यसंपदेकडे हताश होऊन पाहण्याशिवाय मार्ग राहिलेला नसल्याने शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या माध्यमातून दाद मागितली होती.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, तालुका प्रमुख राजा केणी यांनी कंपनी व्यवस्थापन यांना आठ दिवसात मच्छीमार बाधवाना लुकसान भरपाई न दिल्यास कंपनी विरोधात आदोल छेडण्यात येईल असे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मा.आमदार महेंद्र शेठ दळवी शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजाभाई केणी यांनी सागितले
यावेळी कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, जीवन पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह पारंपारिक मच्छीमार निवास पाटील, कैलास पाटील, अमोल पाटील, आदेश पाटील, रविंद्र पाटील, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.