Press "Enter" to skip to content

शिवसेनेच्या जाहिरनाम्यापेक्षा प्रसाद इंगवले यांचा जाहिरनामा मोठ्ठा !

‘अबकी बार दीडशेपार’ दाव्याने प्रभाग 10 मध्ये दावे-प्रतिदावे सुरू

सिटी बेल| पोलादपूर | शैलेश पालकर |

नगरपंचायत पोलादपूरच्या निवडणुकीदरम्यान सर्वच पक्षांच्या निवडणूक जाहिरनाम्यांकडे महात्मा गांधीजींच्या हिरव्या रंगाच्या पंचशतपत्रिकांच्या वाटपामुळे मतदारांकडून सपशेल दूर्लक्ष झाल्यानंतर सर्वात आदर्श जाहिरनामा भारतीय जनता पक्षाचा असल्याचे स्पष्ट झाले असताना वैयक्तिकरित्या प्रभाग 10 चे शिवसेना उमेदवार प्रसाद इंगवले यांनी प्रकाशित केलेला जाहिरनामा 16 पानांचा सर्वात मोठ्ठा अगदी शिवसेना पक्षाच्या जाहिरनाम्यापेक्षा मोठ्ठा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावेळीही जाहिरनाम्यांकडे सपशेल दूर्लक्ष करण्याची मतदारांची परंपरा प्रभाग 10 मध्ये दिसून आली असून प्रसाद इंगवले यांनी ‘अबकी बार दीडशे पार’ असे व्हॉटसऍपवर स्टेटस ठेवल्याने उमेदवारांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

पोलादपूर नगरपंचायतीचे बोधचिन्ह स्वामी कविंद्र परमानंद समाधीस्थळाचे असल्याचे आवर्जून सांगताना शिवसेना उमेदवार प्रसाद इंगवले यांनी मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या भुमिपूजनापासून ओला कचरा व सुका कचरा नियोजनाच्या कामातील सहभागाचे श्रेय घेतले असून स्वामी कविंद्र समाधीस्थळाचे सुशोभिकरण आणि कमान तसेच एसटीस्टॅण्डकडून बाजारपेठेला जोडणारा रस्ता याबाबत श्रेयाचा दावा केला आहे.

अपंग व निराधारांना केलेल्या सहकार्याचा उल्लेख छायाचित्रांसह केल्याने काहिशी नाराजी व्यक्त होत असली तरी वृक्षारोपण, दंतचिकित्सा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, श्रावण महिन्यातील ग्रंथवाचन, मोहरमनिमित्त दर्शन, रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचे नियोजन, कोविड लसीकरण शिबीर, मैला उपसा सप्ताह, प्रतापगड एस.टी.बस सुविधा, विद्यार्थ्यांसाठी एस.टी.प्रवास पास सुविधा, निसर्ग वादळामध्ये मदत कार्य, नोटाबंदी काळात बँकांमध्ये नोटा बदलून मिळण्यासाठी अर्ज, महावितरणकडून ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबाबत सचित्र बहुरंगी जाहिरनामा तयार करून शिवसेना उमेदवार प्रसाद इंगवले यांनी प्रभाग 10 मधील पदपथ व रस्ता बांधणे, मठगल्ली मोहल्ल्यातील मशिदीचे सुशोभिकरण व मठामध्ये बाग-बगिचा व सुशोभिकरण तसेच मुस्लीम मोहल्ला दफनभूमीची भिंत बांधण्याकामी अशी आश्वासनेही या जाहिरनाम्यामधून दिली आहेत.

दुसरीकडे, प्रसाद इंगवले यांच्या व्हाटसऍपवरील स्टेटसचा उल्लेख करून विरोधकांनी अबकीबार दीडशे पार कोण असेल, याबाबत अंदाज व्यक्त करताना दावे प्रतिदावेही सुरू केले आहेत. या लढतीमध्ये मतदारांचा निर्णय पक्का झाल्याचे चित्र दिसून येत असल्याने आज मंगळवारी होणारे मतदानच कल स्पष्ट करणार असल्याचे निश्चित होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.