Press "Enter" to skip to content

कुंडलिका नदी पुलाचे कामास कमालीचा वेग


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड येथील कुंडलिका नदी पुलाचे बांधकामाने कमालीचा वेग घेतला असल्याने पुलाचे बांधकाम लवकरच पुर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे दिसून येत आहे.
सध्या बांधकाम करीत असलेला पुल हा कुंडलिका नदी पुलावरील जुना ब्रिटिश कालीन असून मागील काही वर्षापासून सदरचा पुल हा जिर्णावस्थेेत आला होता.त्यातच पुलाचे कठडेही वाहनांच्या धडका लागून मोडकळीस आले होते तर पुल अरूंद असल्याने कोलाड नाक्यावरील वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत होता.अशा परिस्थितीत पुलाचे अनेकवेळा नुतनीकरणही करण्यात येऊन देखील पुलामुळे उद्भवणाऱ्या नेहमीच्या समस्या मात्र जैसे थेच होत्या.
पुलामुळे उद्भवणाऱ्या समस्यातून तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाने महामार्ग रूंदीकरणाचे काम हाती घेण्यापुर्वीच जुन्या पुलाचे शेजारीच नवीन पुलाच्या बांधकामास सुरूवात केली होती. परंतू बरीच वर्षे नव्या पुलाच्या बांधकामात प्रगतीच होत नव्हती.शेवटी गत वर्षी रूंदीकरणासह जुन्या पुलाच्या शेजारी नव्या पुलाचे बांधकाम पुर्ण होऊन वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. त्यामुळे मार्गक्रमण करीत असताना जुन्या पुलावरील वाहनांचा धोका टळला,शिवाय वाहतूक कोंडीची समस्याही सुटली.नवा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने जुना ब्रिटिश कालीन पुलही या वर्षीच मागीलकाही महिन्यापुर्वी तोडण्यात आला.तर मार्च महिन्यात देशभरात पुकारलेल्या लाँकडाऊनमुळे वाहनांची रस्त्यावर असणारी तुरळक वाहतूक व अन्य रहदारीही कमी असल्याने पुलाचे काम अतिशय वेगात करण्यात आले.महामार्गाचे काम पुढील वर्षी पुर्ण करावयाचे असल्याने व महामार्ग वाहतुकीसाठी खुला करावयाचा असल्याने
सध्या पावसाळा ऋतू सुरू असून देखील पुलाच्या बांधकामाने मात्र कमालीचा वेग घेतला असल्याचे दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.