Press "Enter" to skip to content

अवकाळी पावसामुळे कडधान्ये पिके धोक्यात

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

गेल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.भात कापणी झाल्यावर शेतकरी वर्ग त्याच शेतामध्ये द्विय्यम पिके घेत असतो.भात शेतीमधून उत्पन्न अल्प प्रमाणात मिळाले तरी सुद्धा या कडधान्ये लागवडीमध्ये शेतकरी वर्गांस मोठा नफा होत असतो.यामुळे आपल्या शेतात कडधान्ये च्या समवेत पाले भाज्या चे उत्पन्न घेतले जाते.प्रामुख़्याने तालुक्यात वाल, मटकी, मुग, हरभरे,मका,त्याच बरोबर माठ,मुळा,पालक,आलुची पाणे,पालक,मेथी अदि पिके घेतली जात असतात.

मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गांस मोठे संकट या पिकांवर निर्माण होणार आहे.त्याच बरोबर खोड ,किडा,तसेच पिक येण्यास विलंब रोपांवर विपरीत परिणाम होवून ही रोपे करपून जाण्याची तिव्र शक्यता वर्तवली जात आहे.हीवाळी ऋतू मध्ये ही पिके शेतकरी वर्गांसाठी मोठी लाभदायक असतात.कारण यामध्ये पाण्याची आवश्यकता नसते पहाटे पडत असलेल्य दवा मुळे ही पिके उत्तमपणे बहर आलेला असतो.आणी यापासून मोठी आर्थिक सुद्धा मिळत असते.

म्हणून शेतकरी हिवाळ्यात कडधान्ये पिके घेत असतो.त्याच बरोबर मजुर ची आवश्यक नसते घरातील सदस्य मिळून ही पिके घेवू शकतात.मात्र मागिल आठवड्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हदबल झाले आहे.कारण या पिकातून आपल्याला वर्षेभर पुरेल ऐवढे कडधान्ये मिळत असते किंवा त्यांची विक्री सुद्धा करून आर्थिक भेटत असते. मात्र या वर्ष चित्र थोडे वेगळे असून शेतकरी वर्गांची या पिकांवर खोड किडा पडू नये तसेच दर्जेदार पिक येण्यासाठी फवारणी सुरु केल्याची तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.