Press "Enter" to skip to content

उघड्या चेंबरमुळे अपघातास आमंत्रण

मोहोपाडा एमआयडीसी हद्दीतील आदित्य लॅबसमोरील उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

मोहोपाडा एमआयडीसी वसाहत हद्दीतील आदित्य लॅब व एचडीएफसी बँक समोरील वाॅल चेंबर काही महिन्यापूर्वी एमआयडीसी वॉटर सप्लाय प्रशासनाने बांधला आहे.हा चेंबर बांधून गेली दहा-बारा महिने लोटले गेले आहेत याकडे जाणीपूर्वक एमडीसी वॉटर सप्लायर प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

चेंबरला लागूनच मोहोपाड्याकडे जाणारा रस्ता आहे.या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ सुरू असते. हा चेंबर उघड्या अवस्थेत रस्त्यालगत असल्यामुळे या रस्त्यावरून पादचारी वाहन चालक यांची नेहमी दिवस-रात्र रहदारी चालू असते.

रात्री-अपरात्री या रस्त्याने प्रवास करणारे पादचारी अंधार असल्यामुळे ह्या वाल चेंबर मध्ये पडून जबर जखमी झाले आहेत.अशा घटना सुरुच असून सदर समस्या सोडविण्यासाठी अनेकांनी मागणी केली. परंतु एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात एमआयडीसी प्रशासनाबद्दल चीड निर्माण झाली आहे . म्हणतात ना सरकारी काम बारा महिने थांब ,या म्हणीप्रमाणे एमआयडीसी प्रशासनाचा कारभार चालला आहे .याकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

या वॉल चेंबरवर आदित्य लॅबने मानवता दृष्टिकोन बाळगून तात्पुरत्या स्वरूपात चेंबर्सच्या बाजूने धोका दर्शवणारी प्लास्टिक पट्टी लाकडाच्या सहाय्याने उभी केली आहे. या चेंबरवर लवकरात लवकर एमआयडीसी प्रशासनाने झाकण टाकण्याचे काम करावे. जर का उशीर झाला तर या वॉल चेंबर मध्ये पडूण कोणाच्या जीवावर बेतले तर याला सर्वस्वी एमआयडीसी प्रशासन जबाबदार राहील अशी नागरिकांच्या बाजूने मागणी होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.