Press "Enter" to skip to content

बाधीत कुटुंबाच्या डोळयात आनंदाश्रू

साखर सुतारवाडीतील दरडग्रस्त घरांच्या ढिगाऱ्याखाली सापडले दागिने

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील साखर सुतारवाडी येथे 22 जुलैच्या रात्री अतिवृष्टीदरम्यान भुस्खलन होऊन दरड कोसळल्याच्या दूर्घटनेत 23 घरे जोत्यासह वाहुन गेली होती तर सहा व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला होता. पै पै जमवून साठवलेला दागदागिन्यांसह पैसा अडका गाडला गेल्याने अनेकांच्या संसाराची वाताहत झाली. अनेकांना वृत्तपत्रातील तसेच माध्यमांतील कथांमुळे भरमसाठ मदतीचा आधार मिळाला तर अनेकांना पुन्हा उभारण्याचीही संधी मिळाली नाही.

या गावातील दरडग्रस्तांच्या घरांच्या ढिगाऱ्याखाली दागदागिने असून त्यांना दागिन्यांचा आधार मिळेल या आशेने पोलादपूर तहसिलदार यांच्या माध्यमातून आपत्ती निवारणाचे काम सुरू असताना घर वाहुन गेलेले लक्ष्मण नारायण सुतार यांच्या पत्नीचे काही दागिने ढिगाऱ्याखाली सापडले. सरपंच पांडूरंग सुतार व काही जबाबदार ग्रामस्थांनी बाधित कुटूंबाच्या ते स्वाधीन केले असता त्या कुटुंबाच्या डोळयात आनंदाश्रू आले. आ.गोगावले व राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरचे कार्यकर्ते अनिल मालुसरे यांनी दरडग्रस्त सुतारवाडीतील बाधित घरांच्या ढिगाऱ्याखाली मौल्यवान ऐवज सापडल्यास बाधित कुटूंबियांना आधार होईल, या भावनेतून ढिगारे उपसण्याकामी तहसिल कार्यालयाने सहकार्य करावे, असा पाठपुरावा केला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.