Press "Enter" to skip to content

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

शासनाचा विशेष प्रशासकीय घटक म्हणून माथेरानचे पर्यटन सुरू ठेवा !

सिटी बेल | माथेरान |

०८ जानेवारी २०२२ रोजी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रसारित केलेल्या नवीन नियमावली नुसार स्थानिक पर्यटक स्थळांविषयी काही निर्बंध जाहीर केले आहेत. माथेरानच्या नागरिकांचे उत्पनाचे साधन हे पर्यटकांवर आधारित असल्याने हे पर्यटन स्थळ जर बंद करण्यात आले तर इथल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.याची दक्षता घेत आज माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि इतर मान्यवरांना निवेदन सादर केले आहे.

त्या निवेदनाची प्रत माथेरान शिवसेना संपर्क प्रमुख तथा गटनेते प्रसाद सावंत यांनी मावळचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना आज दिली.

जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिपत्याखाली एखाद्या पर्यटन स्थळास स्वतंत्र प्रशासकीय घटक घोषित करू शकतील असे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने माथेरानचे पर्यटन सुरू ठेवण्यास आपले स्तरावर प्रयत्न व्हावेत तसेच युवासेना प्रमुख व पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत विचारविनिमय करून लवकरच तसे आदेश प्राप्त करू घेण्याचा प्रयत्न करू असे खासदार यांनी सांगितले. या प्रसंगी कर्जतचे माजी नगरसेवक, संतोष पाटील हे खासदार यांच्या थेरगाव या निवासस्थानी उपस्थित होते.

मागील वर्षी २५ जुलै रोजी शासनाचा विशेष प्रशासकीय घटक म्हणून माथेरानचे पर्यटन सुरू ठेवणे बाबत निवेदन दिल्यावर विशेष बाब म्हणून माथेरानला अनलॉक केले होते. हे एकमेव असे पर्यटनस्थळ आहे की इथे पर्यटन हीच शेती असून अन्य काही व्यवसाय उपलब्ध नाही यासाठी या स्थळाची भौगोलिक परिस्थिती पाहून अनलॉक करून हे स्थळ पर्यटकांसाठी खुले करावे.
– नगराध्यक्षा प्रेरणा सावंत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.