Press "Enter" to skip to content

लॉक डाऊनला माथेरानकरांचा विरोध

लॉक डाऊन होऊ नये यासाठी माथेरानच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली आमदार महेंद्र थोरवेंची भेट

सिटी बेल | माथेरान | प्रतिनिधी |

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पर्यटन क्षेत्रे संपूर्ण बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे माथेरान मधील नागरिकांना याची झळ सोसावी लागणार आहे याकामी शिवसेना, काँग्रेस ,आणि शेकापच्या पदाधिकारी आणि शिष्टमंडळाने कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची भेट घेतली तसेंच आमदारांनी जिल्हाधिकारी यांना त्वरित संपर्क साधून माथेरान मधील पर्यटन सुरू ठेवण्यासाठी सहानूभूती पूर्वक विचार करावा असे स्पष्ट केले.

याठिकाणी अन्य व्यवसायाचे साधन उपलब्ध नाही केवळ पर्यटनावर अवलंबून असलेले हे स्थळ आहे नव्वद टक्के लोक हे कष्टकरी आहेत. लॉक डाऊन केल्यास कष्टकरी श्रमिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,राज्यात सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात येत आहे.अनेक पर्यटनस्थळ सुध्दा यामध्ये समाविष्ट केली जात आहेत. परंतु माथेरान हे असे एकमेव ठिकाण आहे की या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर सर्वांचे जनजीवन अवलंबून असते कारण इथे शेती त्याचप्रमाणे अन्य औद्योगिक क्षेत्र, कंपनी अथवा कारखाने नाहीत त्यामुळेच इथला सर्वच कष्टकरी बांधव यामध्ये अश्वपाल, हातरीक्षा चालक वर्ग तसेच हमाली करणारे मजूर ,लहान मोठे स्टॉल धारक यांचे हातावर पोट असते.

त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग सुध्दा इथे भरपूर प्रमाणात आहेत लॉक डाऊन केल्यास आम्हा सर्वांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते तरी लॉक डाऊन करताना काही नियम अटी असल्या तर हरकत नाही परंतु पूर्ण लॉक डाऊन केल्यास इथल्या नागरिकांना खूप त्रासदायक ठरणार आहे. याकामी आपल्या माध्यमातून वरिष्ठांना इथली संपूर्ण परिस्थिती लक्षात आणून दिल्यास हे पर्यटनस्थळ सुरू राहील असेही सर्व उपस्थित शिष्टमंडळाने विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, उप शहर प्रमुख प्रमोद शेठ नायक, सामजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मनोज खेडकर, शेकापचे अध्यक्ष शफीक बढाणे,उमेश कदम,वन समिती अध्यक्ष योगेश जाधव, मा. नगरसेवक शिवाजी शिंदे, पतसंस्था सभापती हेमंत पवार,संदीप शिंदे, गौरंग वाघेला,धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे, यांसह अन्य माथेरान कर मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.