Press "Enter" to skip to content

मनोज म्हसे मुख्याधिकारी पदाची परिक्षा उत्तीर्ण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील वारे या गावात शेतकरी कुंटूबात जन्मलेला मनोज म्हसे मुख्याधिकारी पदाची परिक्षा उत्तीर्ण झाल्याने मनोज चे सर्वत्र कौतुक होत आहे.

मनोज ने प्राथमिक शिक्षण मुळ गावी म्हणजे वारे या एक खेडे गावात पुर्ण केले शिक्षणाची इच्छा असलेल्या मनोज ने जिद्दीच्या जोरावर बीएससी अग्रिकलचर पदवी घेतली.

यानंतर मनोज ने कर्जत नगरपालिकेत 2004 साली कामावरून रूजू झाला शांत आणि मनमिळाऊ मनोज ने अल्पावधीतच नगरपालिकेत सर्वांना आपले केले 2013 साली मनोज खोपोली येथे बदली झाली, त्यानंतर खालापुर, बदलापूर येथे बदली झाली उद्यान, प्रवेशक कर, निरीक्षक मालमत्ता व्यवस्थापक अशा विविध पदावर मनोज ने प्रामाणिक पणे काम केले.

परंतु या पुढे जाऊन आपण काही तरी करून दाखवावे अशी इच्छा मनोज च्या मनात होती, त्यातच अलिकडेच शासनाने दहा टक्के पदांसाठी परिक्षा घेऊन पदोन्नती परिक्षा घेऊन नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी तसेच अधिकारी यांना पनोदीद्वारे मुख्याधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्याचे ठरवले या संधी चे सोने करण्याचे मनोज ने ठरवले सुरुवाती पासून जिद्दी असेल्या मनोज ने संचालक तथा आयुक्त नगपालिका प्रशासन मुंबई यांनी विभागीय परिक्षा घेतलेल्या परिक्षेत घवघवीत यक्ष संपादन करून त्यात मनोज ने 9 क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाला.

मनोज आत लकरच मुख्याधिकारी पदी विराजमान होणार आहे, माणसाकङे जिद्द, चिकाटी असेल तर माणूस काहीही करू शकतो हे मनोज ने दाखवून दिले. मुख्याधिकारी झालेल्या मनोज च सर्व मित्र मंडळी तसेच नागरिकांकङून अभिनंदन होत आहे, या पुढे देखील लोकांना चांगली सेवा देणार असल्याचे या नवीन झालेल्या मुख्याधिकारी यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.