चोरट्याने पळवलेली ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन दिली परत
सिटी बेल | मुंबई |
शिवाजी पार्क येथून 21 जुलै 21 रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील चैन चोरटय़ाने लांबवली होती. आज सहा महिन्यानंतर त्यांची चैन त्यांना परत मिळाली ! आज डीसीपी प्रणय अशोक यांच्या हस्ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ही चैन त्यांना देण्यात आली.
शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कसबे, धांडे, गावित आणि संपूर्ण टिमचे सविता मालपेकर यांनी आभार मानले आहेत.













Be First to Comment