Press "Enter" to skip to content

सामाजिक कार्यकर्ते विकास कडू यांना पितृ शोक

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यातील समाज कार्यात अग्रसेन असणारी चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगडचे संस्थापक -अध्यक्ष विकास कडू यांचे वडील कै.शांताराम पांडुरंग कडू (वय -70)करळ -उरण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

ते आजू बाजूच्या गावात सर्वांच्या सुखात-दुःखात नेहमी आपले योगदान देत असत. त्यामुळे त्यांची कमी आत्ता आजू बाजूच्या गावात नेहमी जाणवत आहे. ते करळ ग्रामस्थ मंडळाचे माजी खजिनदार होते.ते प्रेमळ, मितभाषी, मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने कडू परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण करळ गाव व आजू बाजूच्या गावात शोककळा पसरली आहे.पत्नी, 2 मुले,2 सुना, 1 मुलगी,1जावई, 5 नातवंडे असा त्यांचा कुटुंब परिवार आहे.

उरण तालुक्यातील चाईल्ड केअर सामाजीक संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विकास कडू सामाजिक कार्यकर्ते यांचे ते वडील होते. करळ,सावरखार,सोनेरी, जसखार गावातले ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी , ग्रामस्थ, नातेवाईक यांच्या उपस्थितीत करळ ग्रामपंचायत येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.