Press "Enter" to skip to content

कडसुरे येथील द्रौपदी शिंदे यांचे वृध्दापकाळाने निधन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठण्याजवळील कडसुरे गावातील रहिवासी ह.भ.प. द्रौपदी कृष्णा शिंदे (वय ८३) यांचे नागोठणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर कडसुरे या त्यांच्या मूळ गावी त्याच दिवशी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. द्रौपदी शिंदे यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.

कै. द्रौपदी शिंदे या स्वभावाने खुपच प्रेमळ व धार्मिक होत्या. कडसुरे गावातील सर्व धार्मिक, सामाजिक कार्यात त्या नेहमीच सहभागी होत असत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी सांप्रदायात भक्तिभावाने घालविले. त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. द्रौपदी शिंदे यांच्या निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी दररोज सायंकाळी ७ वाजता हरिपाठ, रोज रात्री ९:३० वाजता ग्रंथ वाचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कै. द्रौपदी शिंदे यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी कडसुरे येथील गाणी या ठिकाणी सकाळी ८:०० वाजता होणार आहे. तर उत्तरकार्य (तेरावे) रविवार दि.९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:१५ वाजता त्यांच्या कडसुरे येथील. नविन घरी होणार असून त्यानिमित्त ह.भ.प.संजय महाराज साळवी, चिपळूण (अध्यक्ष विश्व हिंदु परिषद) यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांचे छोटे सुपुत्र पांडुरंग शिंदे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.