Press "Enter" to skip to content

अंकुश जाधव यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवाशी अंकुश विठ्ठल जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन मृत्यू समयी त्यांचे वय ५९ वर्षाचे होते.त्यांना सर्वजन नाना या नावाने हाक मातर असते.त्यांचा राहणीमान साधा होता.परंतु सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग होता.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधी साठी सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी,एक मुलगा,एक मुलगी, चार भाऊ, भावजया, पुतणे, नातवंडे व मोठा जाधव परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि.४जाने तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि. ७ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या गोवे येथील निवास्थानी होणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.