Press "Enter" to skip to content

मुलांच्या उशाखाली डॉक्टरांनी ठेवल्या भेटवस्तू

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या लहान मुलांसोबत नाताळ साजरा

सिटी बेल | नवी मुंबई |

नाताळ किंवा ख्रिसमस हा सण दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. नाताळ हा शब्द ‘नातालिस’ या लॅटिन शब्दाच्या अपभ्रंशातून आलेला आहे. नातालिस म्हणजे जन्म, इथे मात्र हा शब्द येशूचा जन्म या अर्थाने वापरला जातो. पूर्वी या दिवशी फक्त सामूहिक प्रार्थना होत असे. पुढे एकोणिसाव्या शतकापासून नाताळ सण म्हणून मोठय़ा प्रमाणात, झगमगाटात आणि हर्षोल्हासात साजरा होऊ लागला. याच दिवसाचे औचित्य साधून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर इथे उपचार घेत असलेल्या लहान मुलांसोबत डॉक्टर व नर्सेस यांनी नाताळ साजरा केला.

सांताक्लॉज किंवा संत निकोलस हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्टय़ होय. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात. पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत मानले जाते की, चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना नाताळच्या आदल्या रात्री सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात म्ह्णूच डॉक्टरांनी आदल्या रात्री उपचार घेत असलेल्या मुलांच्या उशाखाली डॉक्टरांनी भेटवस्तू दिल्या व सकाळी चॉकलेट व केक देऊन नाताळ सण साजरा केला.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे नाताळ तसेच इतर सण साजरे झाले नाहीत, याहि वर्षी आपल्यावर अनेक बंधने व नियम आहेत व हेच नियम पाळून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नाताळ साजरा करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.