Press "Enter" to skip to content

शेतकरी कामगार पक्षाची साफसफाई मोहीम

आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठ्यातील मोकळ्या मैदानाची साफसफाई

सिटी बेल | कामोठे |

शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सेक्टर 5,9, व 21 मधील मोकळी मैदानाची साफसफाई करण्यात आली.

पनवेल पालिकेला जरी साफसफाई मध्ये केंद्र सरकारचा पुरस्कार प्राप्त झाला तरीही कामोठे मध्ये अजूनही अस्वच्छता आहे.
नागरिकांच्या तक्रारी आणि आमदारांचा वाढदिवस यांचे मेळ साधून जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेकाप कामोठे यांनी संयुक्त रित्या साफसफाई ची मोहीम चालवली.

यावेळी मा.नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, गणेश खांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.