बिगारी कामगारांच्या मुलांना आई वडिलांच्या कामाच्या ठिकाणी घ्यावा लागतो आसरा
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
पूर्वी एकत्र कुटुंब पध्द्ती होती त्यामुळे लहान मुलांचा सांभाळ आजी -आजोबा करायचे, आता नोकरी कामधंदे यामुळे एकत्र कुटुंब पद्धती मोडीत निघाली आहे.
आता नोकरी निमित्त पालक बाहेर जातात त्यांची मुले सुखरूप राहावीत त्यांचा सांभाळ व्हावा म्हणून ती पाळणा घरात ठेवली जातात, त्यामुळे पाळणाघर ही संकल्पना उदयास आली, सायंकाळी आई वडील कामावरून आली की ते आपल्या मुलांना घरी घेऊन जातात.
मात्र इमारतीवर बिगारी काम करणारे जोडपे कामावर आल्यावर त्यांना पाळणाघर न परवडणारे असते ते आपली मुले घेवून इमारतीवर बिगारी काम करायला येतात, काम करायला लागल्यावर आपले मूल कुढे ठेवायचे तर इमारतीच्या आवारात सावली व योग्य जागा निवडून त्या ठिकाणी साडीच्या आधारे पाळणाघर तयार करतात व आपले मूल त्यामध्ये ठेवून काम करतात.
असेच कर्जत शहरात एका इमारतीचे काम सुरू आहे याठिकाणी साडीच्या माध्यमातून तयार केलेले पाळणाघर त्या मध्ये आपल्या मुलाला ठेवून बिगारी काम करताना दिसत आहे.








Be First to Comment