
दुग्ध आणि पशुपालन व्यवसायात सुद्धा भारत देश अव्वल व्हावा- सभापती वैकुंठ पाटील
पेण, ता. २४ (वार्ताहर) : जगातील अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पाहता यामुळे आपल्याकडे डिझेलची कमतरता भासू लागली त्यामुळे भविष्यात येथे दुग्ध आणि पशुपालन व्यवसायात सुद्धा भारत देश अव्वल स्थानावर जावे यासाठी आपण प्रयत्न करूया असे आवाहन रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी यावेळी केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पशुसंवर्धन भागधारकांकरीता पेण येथील सौभाग्यईन हॉटेल येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेला जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सभापती वैकुंठ पाटील, प्रादेशिक सहआयुक्त कोकण विभाग डॉ.प्रशांत कांबळे, पशुसंवर्धन आयुक्तालय सहआयुक्त डॉ.देवेंद्र जाधव, पंस.सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, जिल्हा उप आयुक्त डॉ. सचिन देशपांडे, डॉ. रत्नाकर काळे, शरद चव्हाण, जेएसडब्लू कंपनीचे अधिकारी सुधिर तेलंग, पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांच्यासह पंस तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती वैकुंठ पाटील म्हणाले की आपला भारत देश सुजलाम सुफलाम असला तरी येथे अन्नधान्य दुध व इतर गोष्टींसाठी सबसिडी मोठ्या प्रमाणात आहे शासन प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना येथील शेतकऱ्यांच्या योजनांसाठी अधिकारी वर्गाने पोर्टलवर त्यांची माहिती योग्य पद्धतीने अपलोड करावी जेणेकरून या खात्याच्या माध्यमातून रायगड जिल्हाचा विकास अधिक साधता येईल आणि दुग्ध तसेच पशुपालन व्यवसायात भारत देश अव्वल स्थानावर जाईल असे मत व्यक्त करत कोकणातील सर्वात मोठी लॅब पेण मध्ये होत असल्याने त्याकरीता लवकरात लवकर आपणाकडून निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी देखील वैकुंठ पाटील यांनी केली.
तर या योजनेत पुर्वी कमी प्रमाणात निधी येत होता मात्र आता मुख्यमंत्री ग्रामीण पशु योजनेच्या माध्यमातून करोड रुपये आले असल्याने या योजनेचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी घ्यावा कोकण विभागामध्ये ही पहिली कार्यशाळा होत असताना ज्या शेतकऱ्यांना आपापल्यापरीने पशु घेता येतील त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येत असल्याचे सांगून लाभार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन कोकण विभागाचे सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले आहे.यावेळी पशुसंवर्धनच्या माहिती पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.




Be First to Comment