Press "Enter" to skip to content

जेष्ठ नागरीक बनले “स्मार्ट”

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांचा जेष्ठ नागरिकांच्यासाठी स्तुत्य उपक्रम

सिटी बेल | पनवेल |

प्रभाग १८ चे कार्यतत्पर आणि कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागातील नागरिकांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. यामध्ये महिलांच्या साठी उद्योग मेळावा, विविध स्पर्धा आणि नाविन्यपूर्ण रीतीने उत्सव साजरे करणे. याच अनुषंगाने प्रभागातील जेष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी पनवेल येथील जेष्ठ नागरिक सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्पुटर, इंटरनेट आणि स्मार्ट फोन यांच्या माध्यमातून घर बसल्या सर्व व्यवहार शिकून जेष्ठ नागरिक स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात या एका विचाराने नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सौ सुवर्ण तोंडुलकर यांनी जेष्ठ नागरिकांशी चांगला सुसंवाद साधून या सर्व उपक्रमाची विस्तृत माहिती दिली.सर्वांना या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्यवस्थित मिळावी यासाठी छोटे ग्रुप तयार करून प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला जेष्ठांनी स्वतःहून प्रशिक्षण वर्गाला नावे नोंदवली.

एकूणच जेष्ठांना आता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे ठरवले आहे हेच या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले.या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री नंदकुमार जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.नगरसेवक विक्रांत पाटील विकास कामांच्या बरोबरच प्रभागातील नागरिक आणि जेष्ठ नागरिकांची आपुलकीने काळजी घेतात या बद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.