Press "Enter" to skip to content

८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ह.भ.प.जोमा गोविंद भगत यांचे दुःखद निधन

सिटी बेल | पनवेल |

पनवेल तालुक्यातील शिवकर गावचे रहिवासी ह.भ. प. जोमा गोविंद भगत यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. शेती जोपासणे आणि मळे फुलवणे या कामी त्यांनी आपली उभी हयात खर्ची घातली. आधुनिक शहरीकरणाच्या जमान्यात देखील स्वतःची शेती हिमतीने सांभाळून, बाकीच्या शेतकऱ्यांनी देखील असेच शेती प्रती प्रेम जोपासले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असे. वारकरी संप्रदायात रमणाऱ्या जोमा गोविंद भगत यांनी २० डिसेंबर २०२१ च्या सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळच्या मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने त्यांची प्राणज्योत मावळली.

ह.भ.प.जोमा गोविंद भगत यांच्या पश्चात सुविद्य पत्नी,पाच मुले,दोन मुली,सूना जावई,नातवंडे असा मोठा भगत परीवार आहे.२० डिसेंबर रोजी रात्री शिवकर स्मशानभूमी मध्ये त्यांच्या पार्थिवावर भजन सुरांच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार पार पडले.

बुधवार दिनांक २९ डिसेंबर रोजी येथील मामा-भाचे याठिकाणी त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे तर उत्तरकार्यविधि शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी शिवकर येथील राहत्या घरी संपन्न होणार आहे. सांत्वनाकरता अथवा उत्तरकार्य करता येणाऱ्या कुणीही दुखवटे आणू नयेत अशी कळकळीची विनंती भगत परिवाराच्या तर्फे करण्यात येत आहे.

ईश्वर ह.भ.प.जोमा गोविंद भगत यांच्या आत्म्यास सदगती प्रदान करो तसेच या दुःखद समयी भगत कुटुंबियांस सावरण्याचे बळ प्रदान करो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.