Press "Enter" to skip to content

पोटनिवडणूक निकाल जाहीर

कर्जत तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक निकाल जाहीर

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी पोटनिवडणूका जाहीर झाल्या होत्या, यामधील 4 ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध झाल्या, 2 ग्रामपंचायतीच्या जागेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाली नाहीत, 3 ग्रामपंचायती 4 जागापैकी 3 जागासाठी दि.21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते, त्यांची मतमोजणी काल दि.22 डिसेंबर रोजी संपन्न झाली.

कर्जत तालुक्यातील हुमगाव-1जागा, वेणगाव -1जागा, भालीवडी-6 जागा, सावळे-2 जागा, माणगाव तर्फे वरेडी -1जागा, बीड -1जागा, नांदगाव -1 जागा, दहिवली तर्फे वरेडी -1 जागा आणि वदप-1जागा अश्या 9 ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता.

———निवडणूक प्रक्रिया—-
माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत प्रभाग -4 मध्ये नयना संदीप गायकवाड-60 (विजयी),वदप ग्रामपंचायत प्रभाग-2 मध्ये कल्याणी कैलास पोटे -333 (विजयी)

———-बिनविरोध सदस्य ———
भालीवडी ग्रामपंचायत 6 जागांसाठी प्रभाग-1 मध्ये दिपक वसंत कार्ले, प्रभाग-2 मध्ये नंदिनी नंदू माळी, प्रभाग-3 मध्ये समीर रामदास ठाकरे व प्रतिका रमेश कटके, प्रभाग -4 मध्ये आशा राजेश कर्णूक व राजेश तुळशीराम शेळके.
बीड ग्रामपंचायत प्रभाग-2 मध्ये हेमंत वासुदेव घरत.
नांदगाव ग्रामपंचायत मध्ये प्रभाग-2 मध्ये देविदास हरी केवारी.
दहीवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत मध्ये प्रभाग-2 मध्ये ज्योत्स्ना किसन जामघरे.

——-नामनिर्देशन पत्र दाखल नाही———
हुमगाव ग्रामपंचायत मध्ये प्रभाग -1 साठी अनुसुचित जमातीसाठी निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
वेणगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आठ महिन्यांनी होणार असल्याने प्रभाग -4 मध्ये निवडणूक नामनिर्देशन पत्र कोणीच दाखल केली नाही.
————-
सावळे ग्रामपंचायत मध्ये प्रभाग- 1मध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग होती मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षण रद्द झाल्याने या जागेसाठी 28 डिसेंबर पासून नामनिर्देश पत्र दाखल करण्याचे सुरू होणार आहे
तर याच ग्रामपंचायत मधील प्रभाग -1 मधील सर्वसाधारण जागेसाठी काल दि.21 डिसेंबर रोजी मतदान झाले आहे मात्र याची मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी होणार आहे तो पर्यत मतपेटी कस्टडीत ठेवण्यात आली आहे,अशी माहितीतहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे रवी भारती यांनी दिली.

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. एच. जाधव, अभिजित खैरे, डी. पी. राठोड यांनी काम पाहिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.