Press "Enter" to skip to content

पोलादपूर तालुक्यात गोफण प्रशिक्षण शिबिर

स्टोन स्लिंग थ्रो फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय गोफण प्रशिक्षण

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

गोफणफेक फेडरेशनमार्फत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात राज्यस्तरीय गोफण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्यातील कित्येक जिल्ह्यातून गोफण खेळाच्या प्रशिक्षणासाठी खेळाडूंनी हजेरी लावली. एकूण 80 खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला आणि यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतले. या शिबिराचे उद्धाटन आ.भरत गोगावले यांच्याहस्ते करण्यात आले. हे शिबिर तीन दिवसांचे असून पोलादपूर तालुक्यातील राष्ट्रीय गोफणपटू ओंकार उतेकर यांनी या प्रशिक्षण शिबिराचे व्यवस्थापन केले.

गोफणफेक फेडरेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना गोफण या खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी फेडरेशन कमिटीने पाहिले राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. या कार्यक्रमासाठी पोलादपूर तालुक्यातील बोरावळेतील लक्ष्मण मोरे, संजय मोदी, लक्ष्मण साने, नारायण साने, ह.भ.प. पांडुरंग उतेकर, मदन उतेकर, अर्जुन चव्हाण, लक्ष्मण कदम, माजी पोलिस उपनिरीक्षक महादेव उतेकर, सिताराम उतेकर, सुजल दळवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

स्टोन स्लिंग थ्रो फेडरेशन भारतभर या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार असून याची सुरुवात महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यापसून करण्यात आली आहे. फेडरेशन डायरेक्टर आणि राष्ट्रीय खेळाडू अवनीश तापकीर, रागिणी अमराळे, प्रसाद तापकीर या पहिल्या प्रशिक्षण शिबिरासाठी आवर्जून उपस्थित राहिले. धैर्य सामाजिक संस्थेचे सदस्य विवेक कदम, आदित्य कदम, शिक्षकवृंद ज्ञानेश्वर उतेकर, सतीश शिंदे, राहुल बावणे यांनी देखील विद्यार्थ्यांसमवेत गोफण प्रशिक्षणात सहभाग घेतला.

याप्रसंगी आ.भरत गोगावले यांनी फेडरेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि गोफण पारंपारिक परंतु नव्याने खेळ स्वरूपात उदयास आलेल्या खेळामध्ये उत्तम खेळाडू घडविण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी फेडरेशन कमिटीला शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.