डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांची इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनला अधिकृत भेट
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांची इनर व्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनला अधिकृत भेट (चेअरमन व्हिजिट) अतिशय उत्साहात संपन्न झाली . आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी खचून न जाता त्याला धैर्याने सामोरे जाऊन आपले उद्दिष्ट कसे पूर्ण करावे आणि सदैव आनंदात कसे राहावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डिस्ट्रिक चेअरमन संतोष सिंग. यावेळी त्यांनी सर्व कमिटी मेंबर्स च्या कामाचे कौतुक करून बहुमोल मार्गदर्शन केले .
या क्लबचे अध्यक्षपद एका कार्यकुशल स्त्रीच्या हाती आहे त्यामुळे तुमचा क्लब उत्तरोत्तर छान प्रगती करेल असे आपल्या भाषणात त्यांनी नमूद करून क्लब प्रेसिडेंट वृषाली सावळेकर यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. यावेळी क्लब बुलेटिन प्रतिबिंबचे प्रकाशन डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास क्लबचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. मा. उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून उपस्थिती लावली.
प्रेसिडेंट वृषाली सावळेकर यांनी आपल्या भाषणात क्लबच्या प्रगतीचे सर्व श्रेय सर्व क्लब मेंबर्सना दिले.
यावेळच्या डिस्ट्रिक थीम ला अनुसरून गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी त्या दृष्टीनेच यापुढे उपक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. सुग्रास भोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.








Be First to Comment