सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील चाणजे ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक सहा मध्ये ग्रामपंचायत सदस्य अमित भगत, व्यंकटेश म्हाञे व सुप्रिया कोळी यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार कोंढरीपाड्यातील हनुमान नगर (काश्मीर गल्ली ) या ठिकाणी नवीन सिंमेट कॉक्रींट रस्त्याचे उदघाटन तसेच बाबदेवपाड्यातील श्री बाबदेव मंदिराच्या पाराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ दिनांक 21 डिसेंबर रोजी पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित भगत, व्यंकटेश म्हाञे, सुप्रिया कोळी तसेच गावातील जेष्ठ नागरिक कृष्णा थळी, भाऊकाका म्हाञे ,अरूण ठाकूर,तेजेश पाटील,सचिन भोईर,नित्या पाटील,कुमार भोईर तसेच महिला विजया म्हाञे, पुष्पा भोईर, वृषाली ठाकूर इत्यादी महिला वर्ग व ग्रामस्थ हजर होते. तसेच निवडणूकीत अमित भगत,व्यंकटेश म्हाञे,सुप्रिया कोळी दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याबद्दल तसेच रस्ता बांधण्यासाठी विशेष सहकार्य करणारे किशोर डाऊर यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.








Be First to Comment