
इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी कु. नेहा संदीप पाटील हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘युविका २०२६’ (YUVIKA 2026) कार्यक्रमासाठी निवड
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील )
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील छोट्याशा उर्से गावातून एक मोठी झेप घेतली गेली आहे… आणि ती झेप आहे थेट अंतराळाकडे!
इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी कु. नेहा संदीप पाटील हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘युविका २०२६’ (YUVIKA 2026) कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
- देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून निवड
- संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त १४ विद्यार्थी
- आणि पालघर जिल्ह्यातून एकमेव — आपली नेहा!
येत्या २० मे पासून श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात तिला प्रगत अंतराळ विज्ञानाचे विशेष प्रशिक्षण मिळणार आहे.
ही केवळ नेहाची नाही, तर उर्से गावाची, तिच्या शाळेची आणि संपूर्ण पालघर जिल्ह्याची अभिमानाची गोष्ट आहे.
आदिवासी भागातूनही स्वप्नांना आकाशाची मर्यादा नसते, हे नेहाने सिद्ध करून दाखवलं आहे! तिचे हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे कु. नेहाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी सिटी बेल परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!



Be First to Comment